Friday, 20 February 2015
सरकार म्हणजे राष्ट्र नव्हे
सरकार म्हणजे राष्ट्र नव्हे ...
जागतिकीकरणाच्या काळात तिसर्र्या जगापुढे अंतर्गत राष्ट्रीय सुरक्षेची मोठी आव्हाने दिसू लागत आहेत. जागतिक व्यापाराचा परिणाम थेट सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रांवर खोलवर मोठा परिणाम होतोय. या मूळे आर्थिक महाशाक्तींची सूत्रे सध्या मुठभर व्यापारी शक्ती गाटा कडे आहे. ते या नव वसाहतवादी खेलीचे मुख्य सूत्रधार आहेत. या सर्व खेळीत राष्ट्रातील सरकारे राष्ट्राचे पाईक होण्याऐवजी या व्यापारी हिताच्या चक्रव्युव्हाचे आपोआप पाईक झालेले आहेत. अश्या राज्य कर्त्यांची व्यवस्था, अवस्था सामाजिक स्थराच्या विकासाला या वातावरणात पोषक भूमिका निभावताना तेवढे सक्षम दिसत नाहीत.
आज लोकशाही असलेल्या राष्ट्रांमध्ये नागरिकांना राष्ट्रीय भावना राष्ट्रातील सरकारच्या निर्णयावर सोडून दिलेल्या आहेत. या वर लोकशाही पद्धतीचे ना नियंत्रण आहे न व्यवस्था. सरकार म्हणजे राष्ट्र असे तत्वज्ञान सध्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेत व्यवस्थित रित्या रूळवलेले दिसते. सामान्य जनतेस विशेष अशी वैचारिक क्षमता बाळगण्याची गरज या जगतीकीकारांच्या सरकारी व्यवस्थानी बनवलेली आहे. भारतात मावोवादी विरुध्ध सुरक्षा यंत्रणा असताना न्याय व्यवस्थेत कमालीची नैतिकता निर्णय क्षमता दिसते जी राष्ट्राच्या सीमे पेक्षा मानवतावादी तत्वाचे पूजक जास्त दिसून येते. सरकारे राष्ट्र सुरक्षे बाबत खूप सत्ता बचावात्मात भूमिकेत या कालखंडात दिसतात तर बहिर्गत विचार तत्वशक्ती ह्या आक्रमक असतात. यालाच जागतिकीकरणाची वाळवी म्हणतात. सावली देणाऱ्या झाडाची गरज बारीक किड्यांना अजिबात नसते. तसे झाड सावली देण्याचा गुणधर्म सोडू शकत नाही आणि वाळवी आपला गुणधर्म सोडायला तयार नाही. ज्याच्या शेतात झाड असते तो शेतकरी पण वाळवी च्या कृत्यावर इलाज करायला वेळ नाहीय. त्याला त्याच्या पिकाच्या भरगोस उत्पादनाची आणि हंगामी फायद्याची चिंता असते. मग या अवस्थेला विशेष प्राधान्य देण्याची गरज आजच्या सत्ताधार्यांना वाटत नाही.
मग प्रति व्यवस्था आपोआप जन्म घेत असते. त्यांना राष्ट्रापुढे सरकारी व्यवस्था प्रथम असेलच असे वात नाही. म्हणून सरकार म्हणजे राष्ट्र नव्हे या सिद्धांतावर काम करणारे देशभक्त देखील या व्यवस्थेत आहे याचे भान प्रतिनिधींनी ठेवायचे असते. जागतिकीकरणात बळी तो कान पिळी हा सिद्धांत लागू होत असतो हे राज्यव्यवस्थेने विसरू नये.
राष्ट्र प्रथम मग राज्य घटना आणि मग सरकारे या सिद्धांतावर नैतिक विश्वास ठेवणे आज गरजेचे झालाय.
Subscribe to:
Post Comments (Atom)
India under non traditional threats in new globalisation era
India is fastest growing economy in the world. Growing economy has facing growing threats. in contemporary era, researchers are threats are ...
-
“Non-traditional threats: Maoism as a new challenge to India ’s Security” ...
-
M.A. Part - I Semister II DEF - 121 - Defence Production in India Topic I Defence Production in India a) Defence Production Organisation (...
-
President Lee Myung-Bak signs deals with Kazakhstan and Uzbekistan; KazMunaiGas Exploration Production signs four new exploration contracts...
sir aapn barobar aahat karan rastr asel tr rajyaghatna aani rajyaghatna asel tr sarkar......
ReplyDelete